मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे खासदार आणि युवा नेते पार्थ पवार यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी अचानक भेट घेतली. सकाळी पावणे अकराच्या सुमारास पार्थ पवार भेटीसाठी पोहोचले आणि तब्बल दीड तास चाललेल्या या प्रदीर्घ चर्चेनंतर ते बाहेर पडले.
भेटीनंतर पार्थ पवार यांनी प्रसारमाध्यमांशी कोणतेही बोलणे टाळले. त्यामुळे या भेटीचा नेमका उद्देश आणि चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यातच राहिला आहे. मात्र, ही भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करणारी ठरली आहे.
भेटीला का महत्त्व?
दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थिती आणि चौकशीच्या मुद्द्यावर ही भेट असू शकते, अशी चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. राज ठाकरेंनीही पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या घडामोडींमध्ये राज ठाकरेंनी घेतलेल्या ‘मराठी पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा’ या भूमिकेनंतर पवार कुटुंबाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही भेट घेतली गेल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
राज ठाकरे आणि पार्थ पवार यांच्यातील ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणांची शक्यता निर्माण करणारी मानली जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीय आणि मनसे यांच्यातील संबंध कसे विकसित होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या या भेटीचे अधिकृत कारण समोर आलेले नाही. मात्र, आगामी काळात या गुप्त भेटीचे राजकीय परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.