⚡ ब्रेकिंग News

तासवडे एमआयडीसीत भीषण स्फोट; १० किलोमीटरपर्यंत परिसर हादरला


साताऱ्यातील केमिकल कंपनीत प्रचंड स्फोट, आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट; इमारतींच्या काचा फुटल्या, भीतीचे वातावरण

सातारा : सातारा जिल्ह्यातील तासवडे एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत सोमवारी सकाळी भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, जवळपास १० किलोमीटरपर्यंतच्या परिसरात हादरा बसला. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली असून, आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट आकाशात दिसत होते.

स्फोट इतका तीव्र होता की, परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या. आवाज ऐकून स्थानिक नागरिक घाबरले आणि घराबाहेर धावले. सुरुवातीला अनेकांना भूकंप झाल्याची भीती वाटली. स्फोटानंतर कंपनीत मोठ्या प्रमाणात आग पसरली असून, केमिकलमुळे आग अधिक वेगाने पेट घेत असल्याचे सांगितले जाते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती नाही, मात्र कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल साठवलेले असल्याने तपास अधिक कठीण होत आहे. पोलिसांनी याबाबत सविस्तर तपास सुरू केला आहे.

 पारनेरमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा घाणेगाव (सुपा औद्योगिक वसाहत) येथील व्यंकटेश पॉली (प्लास्टिक उत्पादन कंपनी) ला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम जोरात सुरू आहे.

या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आगीमुळे कंपनीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...