'राजा माणूस...' 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडचा रोहित शर्मासोबतचा व्हिडिओ व्हायरल; लहानपणीचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावूक पोस्ट
मुंबई इंडियन्सच्या कार्यक्रमात भेटले 'मुंबईचे राजा'; ऑटोग्राफ घेतानाचा क्षण मनमोहक, संजू म्हणाला 'आज लहानपणीचं एक स्वप्न पूर्ण झालं'
'गुलाबी साडी आणि लाली लाल लाल...' या सुपरहिट गाण्याने देशभरात धुमाकूळ घातलेला गायक संजू राठोड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL २०२६) मधील मुंबई इंडियन्स संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्याने 'मुंबईचा राजा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ संजू राठोडने सोशल मीडियावर शेअर केला असून, तो व्हायरल होत आहे.
रोहितकडे ऑटोग्राफ मागताना संजू
संजू राठोडने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर रोहित शर्मासोबतचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संजू रोहितकडे ऑटोग्राफ मागताना दिसत आहे. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि हात मिळवले. रोहितने संजूच्या टीशर्टवर ऑटोग्राफ दिला. हा क्षिम संजूसाठी खऱ्या अर्थाने फॅन मूव्हमेंट ठरला.
'लहानपणीचं स्वप्न पूर्ण झालं'
व्हिडिओ शेअर करताना संजू राठोडने भावूक कॅप्शन लिहिले आहे. त्याने लिहिले, “आज लहानपणीचं एक स्वप्न पूर्ण झालं, धन्यवाद रोहित शर्मा, राजा माणूस... Childhood Dream Turned Into Reality.” या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
गाण्यांनी केले मनोरंजन
मुंबई इंडियन्सच्या या कार्यक्रमात संजू राठोडने आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विशेष म्हणजे, 'गुलाबी साडी' या त्याच्या गाजलेल्या गाण्यावर सर्वांनी थिरकत आनंद लुटला. भारतासह परदेशातही या गाण्याने लोकप्रियता मिळवली आहे. स्वतः गीतकार असलेल्या संजूने अनेक सुपरहिट गाण्यांनी श्रोत्यांची मने जिंकली आहेत.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.