⚡ ब्रेकिंग News

'बिग बॉस मराठी ६' मध्ये मगरीची दहशत! या आठवड्यात 'मेगा एलिमिनेशन'चा धक्का, एकावेळी अनेक स्पर्धकांचा पत्ता कट होणार?


  'बिग बॉस मराठी ६' मध्ये मगरीची दहशत! या आठवड्यात 'मेगा एलिमिनेशन'चा धक्का, एकावेळी अनेक स्पर्धकांचा पत्ता कट होणार?

 बिग बॉसच्या घरात आगळ्यावेगळ्या नॉमिनेशन टास्कची एन्ट्री; मगर आणूनच खेळवला जाणार खेळ

 'मी इथे भजे तळायला आलो नाही' म्हणत प्रभू-सागरमध्ये रंगली जोरदार भांडणतंटा

 एकापेक्षा अधिक सदस्यांच्या एलिमिनेशनचा इशारा; स्पर्धकांचे पांढरेफटके चेहरे

मुंबई: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये सध्या रंगतदार ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. रुचिता जामदार आणि प्राजक्ता शुक्रे या दोन्ही टॉप स्पर्धकांना घराबाहेर पडल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. अशातच आता बिग बॉसने येणाऱ्या आठवड्यात प्रेक्षकांसाठी आणखी एक धक्कादायक आश्चर्य रिझर्व्ह ठेवलं आहे. या आठवड्यात 'मेगा एलिमिनेशन' होणार असून, एकावेळी अनेक स्पर्धक घराबाहेर जाऊ शकतात.

मगरीच्या तोंडी अडकणार स्पर्धक?

कलर्स मराठीने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसने या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क खास आणि आगळावेगळा असल्याचे सांगितले आहे. बिग बॉसने घरात प्रत्यक्ष मगर आणून ठेवली असून, स्पर्धकांना या मगरीच्या तोंडी जाण्याची वेळ येणार आहे. जे स्पर्धक या टास्कमध्ये मगरीच्या तोंडी अडकतील, त्यांना थेट एलिमिनेशनला सामोरे जावे लागणार आहे.

प्रभू-सागरमध्ये रंगली जोरदार भांडणतंटा

प्रोमोमध्ये प्रभू आणि सागर कारंडे यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळत आहे. प्रभू सागरला म्हणतोय, "मी इथे भजे तळायला आलो नाही." त्यावर सागरही चिडत म्हणतोय, "तू काहीही म्हणशील आणि मी ऐकून घेईल, हे होणार नाही." दोघांचे आवाज चढलेले असतानाच बिग बॉसची घोषणा होते की, या आठवड्यात एकापेक्षा अधिक सदस्य घराबाहेर जातील. या घोषणेनंतर सर्व स्पर्धकांचे चेहरे अक्षरशः पांढरे पडल्याचे दिसत आहे.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया सुरू

बिग बॉसच्या या नव्या प्रोमोवर चाहत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहींच्या मते सागर प्रभुला घाबरत आहे, तर काहींनी "काटा चांगला बाहेर काढा" असे म्हटले आहे. अनेक चाहते तन्वीला बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. तर काही प्रेक्षक म्हणतात, "बिग बॉसने जे ठरवलं आहे त्यांना पटापट काढून टाका आणि जो ठरलेला विनर आहे त्याला ट्रॉफी द्या."

आता या आठवड्यात नेमके कोणते स्पर्धक मगरीच्या तोंडी अडकतील आणि कोणाचा पत्ता कट होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...