छत्रपती संभाजीनगर: शहरात शनिवारी रात्री घडलेल्या एका अत्यंत क्रूर आणि अमानुष हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. गंगापूर–लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा परिसरात ३२ वर्षीय सीताराम आसाराम आळंजकर या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी निर्जन शेतात नेलं आणि धारदार शस्त्राने त्याच्या गुप्तांगावर जीवघेणा वार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी फाट्याजवळील एका शाळेजवळ सीताराम उभे असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना जबरदस्तीने पकडले. त्यानंतर रस्त्यालगतच्या निर्जन शेतात नेलं आणि तेथे त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी विशेषतः गुप्तांगावर वार करत गंभीर जखमा केल्या. हल्ल्यानंतर आरोपींनी जखमी अवस्थेतच सीताराम यांना पुन्हा रस्त्यावर आणून फेकून दिले आणि घटनास्थळावरून फरार झाले.
या घटनेनंतर सीताराम बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडून होते. त्यांच्या चुलत भावाने त्यांना तातडीने गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत.
परिसरात भीतीचे वातावरण
या क्रूर हल्ल्यामुळे शिंदेवाडी फाटा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.
नागरिकांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पेट्रोल टंचाईच्या अफवेवरून दुचाकी पेटवली
छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसरी एक घटना शुक्रवारी घडली. इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण झाल्याच्या अफवेवरून शरद गणपत भोजने (नाव) या तरुणाने सिल्लोड-कन्नड रस्त्यावर आपली मोटारसायकल भररस्त्यात पेटवून दिली. तो दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी तातडीने आग विझवली आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.