⚡ ब्रेकिंग News

सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती; अध्यक्षपदावर राजकीय खेचाखेची

 सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती; अध्यक्षपदावर राजकीय खेचाखेची

सातारा: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने २७, राष्ट्रवादी काँग्रेसने २० आणि शिवसेनेने १५ जागा जिंकल्या. बहुमतापासून (३३) कोणीही दूर राहिल्याने राष्ट्रवादी-शिवसेना युतीकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत.

जिल्हा नियोजन समिती बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री शंभूराजे देसाई व बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले एकत्र आले. राष्ट्रवादी-शिवसेना युतीबाबत शंभूराजे म्हणाले, शिवसेना सदस्यांचा मत विचारात घेऊन अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवू. अंतिम निर्णय त्यांचाच असेल.

राजकीय जुगलबंदी

मंत्रालयाबाहेरी पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, "शंभूराजे पालकमंत्री आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. त्यांनी 'हात पुढे केला तर मिठी मारू का?' असे विचारले. मी म्हणालो, 'चालेल तर मिठी मारू!'"

दोन बैठकींना बोलावले तरी न आल्याबद्दल शंभूराजेंनी नाराजी व्यक्त केली. शिवेंद्रराजे म्हणाले, "वातावरण नीट नव्हते, आता नीट झाले. आम्ही विकासासाठी एकत्र आहोत. पुढचे बघू." थेट उत्तर टाळत सत्तानाट्यावर अप्रत्यक्ष भाष्य केले.

सत्तास्थापनेची चर्चा

राष्ट्रवादी-शिवसेना युतीत पहिल्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे व उपाध्यक्षपद शिवसेनेकडे असा फॉर्म्युला चर्चेत आहे. भाजपला सहभागी करून घेणार का, याकडे लक्ष लागले आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...